कंसत, मावळ परिसरात तरुणांमध्ये वाढते हार्ट अरेस्टचे प्रमाण – नवीन ‘सायलेंट किलर’ म्हणून चिंता #MahavirHospitalKamshet #DrVikeshMutha
विशेष प्रतिनिधी | आरोग्य विश्लेषण | डॉ. विकेश मुथा, महावीर हॉस्पिटल, कामशेत कामशेत (मावळ): “हसत-खेळत असलेला तरुण अचानक कोसळला” — अशा बातम्या आता केवळ शहरापुरत्याच मर्यादित नाहीत. मावळ, कर्जत, लोनावळा, कामशेत परिसरात तरुणांमध्ये अचानक हार्ट अरेस्टची प्रकरणं वाढत आहेत , असा गंभीर इशारा महावीर हॉस्पिटल, कामशेत येथील डॉ. विकेश मुथा यांनी दिला आहे. “वय १८ ते ४० या गटात अचानक हार्ट बंद पडण्याच्या घटना वाढत आहेत. अनेक वेळा कोणतेही लक्षण नसते… आणि मृत्यू काही सेकंदांत होतो,” — डॉ. मुथा. हार्ट अटॅक नव्हे, ‘हार्ट अरेस्ट’ – फरक समजून घ्या सामान्य समजुतीप्रमाणे छातीत दुखणे म्हणजे हार्ट अटॅक. पण हार्ट अरेस्ट वेगळा आणि अधिक घातक . हार्ट अटॅक – हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे हार्ट अरेस्ट – हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टीम अचानक बंद पडणे यामुळे हृदय काही सेकंदात थांबते आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा थांबतो. मावळातील तरुणांमध्ये धोका का वाढतोय? डॉ. मुथा यांच्या मते, या भागात तरुणांमध्ये खालील कारणांनी धोका वाढतो आहे: 1) ताणतणाव आणि झपाटलेली जीवनशैली नोकरीचा ताण, अभ्यासाचा दबाव, सतत रात्र...